Advertisement

Marathi Letters : Sample 2 As per New Syllabus SSC March 2019



साधना प्रिंटिंग प्रेस,
महात्मा गांधी रोड,
पुणे, ४११०२०.
२० जून २०१८.

प्रति,
नवीन बुक डेपो,
शिवाजी चौक ,
नासिक – ४२२००९.

विषय :- पुस्तकांचे वितरण.

महोदय /महोदया ,

आपले दिनांक ९ जून २०१८ चे क्रमांक nbd/176 चे पत्र मिळाले. आपण ऑर्डर केल्याप्रमाणे आम्ही मराठी व्याकरण,बालभारती इयत्ता 1ली ते 7 वी पर्यंत आणि गणित 8वी ते 10वी पर्यंतचे एकूण 200 पुस्तकें पाठवित आहोत. त्यांच्या किंमती खालील प्रमाणे आहेत.

पुस्तकांचे नाव – दर रु. – नग – किंमत रु.
१ मराठी व्याकरण 20 40 800
२ बालभारती 40 100 4000
३ गणित 60 60 3600

एकूण किंमत : रु.8400

आम्ही आपणास पुस्तकें मारुति कूरियर ने पाठवित आहोत. कंसाईनमेंट नंबर ४५६९२१ आहे. आपण पुस्तकें मिळाल्याची पोच द्यावी. आपण आम्हांस डिमांड ड्राफ्ट किंवा बैंक ट्रांसफर ने पैसे पाठवू शकता. त्यासाठी अकाउंट नंबर आणि बँकेचा तपशील आपणास पाठवत आहोत :

खातेदाऱ्याचे नाव : साधना प्रिंटिंग प्रेस.
बँकेचे नाव : स्टेट बैंक ऑफ इंडिया, कोरडेवाडी शाखा.
अकाउंट नंबर : ४२३४६६७६९३.

पोच मिळाल्यानंतर ८ दिवसांच्या आत पैसे पाठवावे. त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक दिवसास १२% प्रमाणे व्याज द्यावे लागेल.
पुस्तकांची डिलीवरी वेळेवर न झाल्यास आम्ही जबाबदार नाही. आम्ही कूरियर कंपनीशी पत्रव्यवहार करून आपणास मदत करू शकतो.
कळावे,

आपले स्नेहांकित,
सू. श्री. जोशी.[संचालक] साधना प्रिंटिंग करिता.

Letter Writing in Marathi Example